HOME > UPCOMING TOURS > तोंडोशी ची रामघळ व माहुली
तोंडोशी ची रामघळ व माहुली
Overview
Date: 21 July 2024
Price: Rs. 1,600/- per person
तोंडोशी ची रामघळ व धबधबा
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेल्या घळी ह्या रामघळी म्हणून प्रसिद्ध पावल्या. ज्यामध्ये प्रसिद्ध शिवथर घळीसोबत हेळवाक, चंद्रगिरी, तोंडोशी, जरंडा, सज्जनगड, मोरघळ, चाफळ ची घळ ह्या काही कमी प्रसिद्ध घळीचा समावेश आहे. तोंडोशी च्या रामघळीलाच तरळ्याची घळ अथवा कळंब्याची घळ असेही म्हणतात. तोंडोशी गावातून तारळी धरणाच्या अलीकडून एक कच्चा रस्ता ह्या रामघळीकडे जातो. गाडीचा रस्ता संपल्यावर सुमारे २०-२५ मिनिट डोंगरावरच्या पाऊलवाटेने गेल्यावर आपण ह्या रामघळीपाशी पोहोचतो. पाऊस जास्त झालेला असेल तर वाटेत निसरडे झालेले असते. घळीच्या अलीकडे थोड्या ओबड धोबड पायऱ्या चढून जावे लागते. कड्याच्या पोटाशी असलेली ही घळ सुमारे पन्नास मीटर लांब आहे. घळीमध्ये राम, लक्ष्मण, सीता व मारुतीच्या मूर्ती आहेत. घळीचा बहुतांश भाग जाळीच्या कुंपणाने बंदिस्त केलेला आहे. घळीमध्ये एक साधूचे वास्तव्य असते. घळीच्या छतावरूनच एक धबधबा पावसाळ्यामध्ये कोसळतो. पाण्याच्या स्रोत पसरलेला असल्याने मुख्य धबधब्याच्या आजूबाजूला अजूनही लहान मोठे धबधबे पडताना दिसतात.
दक्षिण काशी विश्वेश्वर मंदिर, संगम माहुली व रामेश्वर मंदिर, क्षेत्र माहुली
कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगम परिसरामध्ये अनेक मंदिरे बघायला मिळतात त्यामध्ये काशी विश्वेश्वर मंदिर हे सर्वात मोठे व तुलनेने चांगल्या स्थितीमध्ये आहे. हे देखणे मंदिर श्रीपतराव पंतप्रतिनिधींनी १७३४ साली बांधले. मंदिराचा आवार साधारण पंचकोनी असून मंदिराच्या पश्चिमोत्तर बाजूस ओवऱ्या आहेत तर लागूनच पूर्व बाजूला अष्टकोनी नगारखान्याची वास्तू आहे.
मुख्यमंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात केले असून शिखर चूनेगच्ची बांधकामाने सजवले आहे .मंदिराच्या गर्भगृहाचे बाह्यांग तारकाकृती असून मंदिराचा मुखमंडप ,स्तंभ रचना पाहीली असता 12-13 व्या शतकातील यादव कालीन मंदिराची आठवण होते. मंदिराच्या समोर स्वतंत्र नंदी मंडप आहे. यातील नंदी सुध्दा अतीशय सुबक आहे. नंदी मंडपाच्या पुढे काही अंतरावर नदीकडे उतरत जाणाऱ्या पायऱ्या व त्या पुढे वाळू खाली दडलेला घाट आहे. या घाटास राजघाट असे म्हणतात.
नदीच्या पलीकडील तीरावर एक सुंदर घाट दिसतो जो पेशवेकालीन सावकार अनगळ ह्यांचा घाट म्हणून प्रसिद्ध आहे. हा घाट व त्यावरील रामेश्वराचे मंदिर परशुराम नारायण अनगळ यांनी सन १७०८ मध्ये बांधले. हे मंदिर छोटेखानी असले तरी अतिशय सूबक आणि मजबूत बांधणीचे आहे. मंदीराच्या समोर पक्षांचे कोरीवकाम असलेली दीपमाळ आहे. इथला नंदीमंडपही स्वतंत्र असून आतील नंदी अतिशय देखणा आहे.
CONTACT

101, First Floor, Aas, Varad Hsg. Soc.
Viththalwadi, Pune - 411 051. Maharashtra
+91 99222 14812, +91 98220 02594
info@uniqueexplorers.co.in
Unique Explorers © 2019-2024 All Rights Reserved.